व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रामसेवकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:39 PM2018-07-31T12:39:37+5:302018-07-31T12:39:44+5:30

प्रशासकीय बैैठकांच्या नावाखाली ग्रामपंचायतीत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कामचुकार ग्रामसेवकांविरोधात सरपंचांनी तक्रारीचा पाढा वाचला.

 Look at Gramsevaks from Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रामसेवकांवर नजर

व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रामसेवकांवर नजर

ठळक मुद्दे सरपंचांचा आरोप : बैठकांच्या नावाखाली दांडी, कामकाजाचा आता आॅनलाइन आढावा

शिवाजी पवार
श्रीरामपूर : प्रशासकीय बैैठकांच्या नावाखाली ग्रामपंचायतीत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कामचुकार ग्रामसेवकांविरोधात सरपंचांनी तक्रारीचा पाढा वाचला. अखेर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून ग्रामसेवकांच्या कामाचा नियमित आढावा सरपंच महाशयांना सादर करण्याचा निर्णय पंचायत समिती स्तरावर घेण्यात आला. आता दोघांमध्ये हरवलेला समन्वय पुन्हा स्थापित करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
श्रीरामपूर पंचायत समितीत सोमवारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात समन्वय घडवून आणण्याकरिता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गटविकास अधिकारी मोहन जाधव, सहायक गटविकास अधिकारी सुखदेव काळोखे यांच्यासह तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक बैठकीला उपस्थित होते. बैठकीत अनेक सरपंचांनी ग्रामसेवकाविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला.
ग्रामसेवकांना पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा परिषदेशी संबंधित कामकाजाच्या आठवड्यात दोन ते तीन बैैठका असतात. त्यातच दोन शनिवारच्या सुट्ट्या हमखास मिळाल्या आहेत. चार रविवारांचा समावेश करता ग्रामसेवक उपलब्धच होत नसल्याची तक्रार सरपंचांनी केली. बैठकीच्या नावाखाली ग्रामसेवक तालुक्याला जातात. मात्र अनेकदा अशी कुठलीही बैैठकच आयोजित केलेली नसल्याचे समजते. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, ग्रामसेवकांच्या तहसील, पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषदेमध्ये होणाºया बैैठकांबाबत सरपंचांना तालुक्याला होणाºया बैैठकांची कल्पना दिली जाणार आहे. त्याबाबतचा तपशीलदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

एकतर ग्रामसेवकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहायला हवे. आमचे ग्रामसेवक आठवड्यातून एक-दिवस गावात येतात. वसुलीची कामे ठप्प झाली आहेत. दलित वस्तीतील कामे ठप्प असून, मुदत संपत आली असताना ऐनवेळी प्रस्ताव तयार करण्याची सूचना ग्रामसेवकाने दिली. ग्रामसेवक मुरब्बी असतात व त्यातही संघटित आहेत. संपूर्ण गावाचा गाडा हाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र मी जेरीस आलो आहे. त्यांच्या बदलीचे अधिकार मला दिले जावेत.
-प्रभाकर कांबळे, सरपंच, खिर्डी ग्रामपंचायत.


पंचायत समिती स्तरावर पंधरवड्याला बैठक असते. याशिवाय घरकुल व शौचालयांसंबंधी जिल्हा परिषदेतही बैठकांना उपस्थित राहावे लागते. कृषी विभागाकडून पीककापणी प्रयोग व इतर कामांचा तगादा असतोच. बीएलओच्या कामांमुळे तहसील कार्यालयातही हेलपाटे सुरू असतात. एवढे करूनही आम्ही सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायतीत कामे करतो. कामचुकारपणा करणारे एखाद-दुसरे अपवाद असतात. मात्र तो नियम नाही.
-आर. एफ. जाधव, ग्रामसेवक, टाकळीभान.

Web Title:  Look at Gramsevaks from Whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.