सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2023 10:31 AM2023-12-01T10:31:11+5:302023-12-01T10:31:25+5:30

काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला.

Loss of tur, millet, cotton crops due to continuous unseasonal rains in ahmednagar; Farmers worried | सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

अहमदनगर तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात रविवारपासून सतत असलेल्या अवकाळी पावसाने तूर, बाजरी, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात  पावसाअभावी आधीच दुष्काळी परिस्थितीच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे आणखी बेजार केले आहे.

तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा मंडळात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह खरिपाच्याही विविध पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तालुक्यातील भातकुडगाव मंडळात तर अतिवृष्टीची नोंद झाली, लागोपाठ झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तूर, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला. तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या कापूस, तूर, कांदा, डाळिंब, टोमॅटो, लिंबू आदि पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात रविवारी व त्या पाठोपाठ बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुस्कानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनास दिल्या. त्यानुसार कामगार तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी  शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश  तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिले आहे. 

Web Title: Loss of tur, millet, cotton crops due to continuous unseasonal rains in ahmednagar; Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.