यंदा भरपूर आमरस.....केशर शंभर रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:17+5:302021-05-12T04:21:17+5:30
अहमदनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण अक्षय तृतीया सणासाठी शहरात आंब्यांची आवक वाढली आहे. आंब्यांच्या व्यवसायावर यंदा कोरोनाचे सावट ...
अहमदनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण अक्षय तृतीया सणासाठी शहरात आंब्यांची आवक वाढली आहे. आंब्यांच्या व्यवसायावर यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा व्यवसाय निम्म्यावर आल्याचे व्यापारी सांगत आहेत. नगर शहरात गेल्या आठ दिवसांपासून कडक लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद आहेत. व्यापारी घरामधूनच आंब्याची विक्री करीत आहेत. लॉकडाऊन असला तरी आवक चांगली असल्याने आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत.
कोरोनाचे सावट असले तरी आंब्यांचे दर आवाक्यात असल्याने यंदा भरपूर आमरसाची चव चाखण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. त्यासाठी नगर शहरात केसर, बदाम, लालबाग, हापूस, पायरी आदी आंब्यांची आवक वाढली आहे. केसर १०० ते १२० रुपये तर बदाम आणि लालबाग ७० ते ८० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
आमरसाकरिता या आंब्यांना सर्वाधिक मागणी आहे. कापून खाण्यासाठी तसेच रस करण्यासाठी हापूस आंब्यालादेखील मागणी आहे. वेगवेगळ्या हापूस आंब्याचे दर यंदा बाजारात ४०० ते ७०० रुपये डझन आहेत.
------
आवक वाढली, ग्राहक रोडावले
अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने बाजारात आंब्याची आवक वाढली आहे; परंतु कोरोनामुळे ग्राहक रोडावल्यासारखी परिस्थिती आहे. कोरोना संसर्गाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. कठोर निर्बंधांमुळे सध्या बाजारपेठ बंद आहे. अनेक जण कोरोनामुळे बाहेर पडताना दिसत नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये दु:खद घटना घडल्या आहेत. अनेक कुटुंबे अजूनही कोरोनाने ग्रस्त आहेत. त्यामुळेदेखील ग्राहकांची संख्या रोडावली आहे. खवय्यांनी मात्र आंब्याची चव चाखण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. असे असले तरी आंब्याच्या बाजारावर कोरोनाचा परिणाम झाल्याने व्यवसाय निम्म्यावर आला आहे.
---------------
विविध राज्यांतून आंब्याची आवक
शुक्रवारी (दि.१४) सर्वत्र अक्षय तृतीया साजरी होत असून, या पार्श्वभूमीवर यंदाही गुजरात, बलसाड, चाकूर आणि जुनागडमधून केसर आंबा दाखल झाला आहे. रत्नागिरी येथून पायरीची आवक आहे. हैदराबादमधून बदाम मोठ्या प्रमाणात येत आहेत. गावराण आंब्यांची आवक कमीच आहे.
---------------
गतवर्षीपेक्षा आंब्याचे यंदा भाव वाढलेले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आंब्याचे दर वाढलेले आहेत. हापूसच्या वेगवेगळ्या दर्जाप्रमाणे आंब्याचे दर आहेत. केशर अंबाबी १०० पासून २०० पर्यंत आहे. अक्षय तृतीयेमुळे हापूसला चांगली मागणी आहे.
-अमित काळे, व्यापारी, सावेडी.
----------
किरकोळ बाजारात आंब्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कठोर निर्बंधांमुळे गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांवर विक्री आली आहे. अक्षय तृतीयेमुळे व्यवसायात तेजी आली आहे. आलेला माल संपला आहे. सणासाठी देवगड आणि रत्नागिरी हापूसला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे.
- रवींद्र शित्रे, व्यापारी.
---------
हापूस आंब्यांचे दर
हापूस- ५०० ते १२०० रुपये डझन
देवगड- ४०० ते ७०० रुपये डझन
रत्नागिरी-३५० ते ७०० रुपये डझन
-----------
केशर- १०० ते १४० रुपये किलो
लालबाग-७० ते ८० रुपये किलो
पायरी-७५० ते ११०० रुपये डझन
-----------
शेतकरी काय म्हणतात.
दोन प्रतिक्रिया आहेत.
-------
डमी - नेट फोटो
१० मॉंगो मार्केट डमी
मॉंगो