अमरधामच्या धुराचे लोट शहरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:08+5:302021-04-25T04:21:08+5:30

अहमदनगर : जिल्हाभरातील कोरोनाच्या रुग्णांवर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. दिवस-रात्र अंत्यविधी सुरू असल्याने लाकडाचा धूर, ...

Lots of smoke from Amardham all over the city | अमरधामच्या धुराचे लोट शहरभर

अमरधामच्या धुराचे लोट शहरभर

अहमदनगर : जिल्हाभरातील कोरोनाच्या रुग्णांवर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. दिवस-रात्र अंत्यविधी सुरू असल्याने लाकडाचा धूर, तसेच हवेतून त्याचा वास शहरभर पसरतो आहे. यामुळे नगरमधील नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अमरधामधील अंत्यविधी ग्रामीण भागात करण्यात यावेत, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात आ. जगताप यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची रोज संख्या वाढत आहे. त्यात मृत्यूचे आकडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. नगर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधित असलेल्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर नगरच्या अमरधाममध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. विद्युत दाहिनीला मर्यादा असल्याने बहुतांशी अंत्यविधी अमरधाममधील मोकळ्या जागेत लाकडावर केले जात आहेत. त्यामुळे नगरमध्ये दिवस-रात्र धूर पसरतो. तसेच दहनामधून जो विशिष्ट प्रकारचा वासही शहरात दूरपर्यंत व अमरधामच्या चोहोबाजूंनी पसरतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव हवेतूनही होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी देखील अमरधाममध्ये होणारे अंत्यविधी हे स्थानिक स्तरावरच व्हावेत. ज्या तालुक्यातील मयत व्यक्ती आहेत, त्याच तालुक्यात त्यांचा अंत्यविधी व्हावा. ज्यामुळे अमरधाममध्ये होणारी वर्दळ कमी होईल. तसेच नगर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचेही अंत्यविधी लवकर करता येतील. याबाबत यंत्रणेला आदेश द्यावेत, असे पत्रात म्हटले आहे.

--------------

रात्री जाणवतो जास्त धूर

बहुतांश मयतांवर रात्री दहानंतर अमरधामध्ये अंत्यविधी केले जातात. एकाच वेळी ३० ते ४० चिता पेटविल्या जातात. त्यामुळे एकाच वेळी धूर येतो. तो धूर अमरधामच्या ठिकाणापासून पाच ते दहा कि.मी. अंतरापर्यंत पोहोचतो. सारसनगर, बालिकाश्रम रोड, मध्य शहर, कल्याण रोड आदी रहिवासी असलेल्या भागात हा धूर पसरल्याने नागरिकही चिंतेत आहेत. चिता पेटल्यानंतर तसेच विझल्यानंतही विशिष्ट असा वास येतो. तो वासही दूरपर्यंत शहरात परसलेला असतो. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

Web Title: Lots of smoke from Amardham all over the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.