प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो :  जडले पुस्तकांबरोबर प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:10 AM2019-02-14T11:10:49+5:302019-02-14T11:11:05+5:30

सातवीत असणारा बाभुळवाडे प्राथमिक शाळेतील प्रसाद विकास जगदाळे

 Love does not have 'single' days: love with broken books | प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो :  जडले पुस्तकांबरोबर प्रेम

प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो :  जडले पुस्तकांबरोबर प्रेम

सातवीत असणारा बाभुळवाडे प्राथमिक शाळेतील प्रसाद विकास जगदाळे याने दोन-तीन वर्षांत सुमारे तीनशे लहान व दीडशे मोठी पुस्तके वाचली. पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयातील आठवीतील अनुजा पाटोळे ही सुध्दा लहानपणापासून पुस्तकप्रेमी असून सुमारे तीनशे मोठी व सहाशे लहान पुस्तके तिने वाचली आहेत़ पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील प्राथमिक शाळेत प्रसाद विकास जगदाळे हा सातवीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे़ वडील पारनेर कारखान्यात कामगार आहेत़ आई कविता या शेतमजूर आहे़ त्याला लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने तेथील शिक्षक संजय रेपाळे यांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांच्या गोष्टींची छोटी पुस्तके वाचण्यास दिली़ ती पुस्तके त्याने एका रात्रीत वाचून दुसऱ्या दिवशी पुन्हा शिक्षकांना दिली़ शिक्षकांनी त्याला त्या पुस्तकातील काही प्रसंग विचारल्यावर त्याने ते प्रसंगही सांगितले़ प्रसादचे वाचनावर प्रेम आहे हे त्यांच्या लक्षात आले़ सहावीत ‘नाना मी साहेब झालो’, ‘मन मे है विश्वास’,‘गरूडझेप’, सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र याबरोबरच ययाती, छावा, महात्मा गांधींचे आत्मचरित्र, संत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता, अग्नीपंख यांच्यासह सुमारे एकशे तीस मोठे पुस्तके व तीनशे लहान पुस्तके त्याने दोन वर्षांत वाचली आहेत़ प्रसादला विचारल्यावर माझ्या वाचनामुळेच माझे भवितव्य घडणार असल्याने माझे पुस्तकांवर पे्रम असल्याचे प्रसाद सांगतो़ पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयातील अनुजा पाटोळे ही आठवीमध्ये शिक्षण घेते़ चौथीपासून अनुजाने पुस्तक वाचण्यास सुरवात केली़ अनुजा ही घरी सर्व कामे करून अभ्यासाबरोबरच दररोज एक कोणतेही छोटे पुस्तक वाचायची. अनुजाने आतापर्यंत सुमारे तीनशे मोठी व पाचशे ते सहाशे लहान पुस्तके वाचून काढली आहेत़ अनुजाचे वडील गॅस वाटपाचे वाहनावर चालक आहेत़आई दैवशाला व वडील अभिमान हे तिला पुस्तके आणून देतात़नवीन कोणते पुस्तके बाजारात आली तर आई वडील लगेच तिला वाचण्यासाठी घेऊन येतात़
- विनोद गोळे, पारनेर

Web Title:  Love does not have 'single' days: love with broken books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.