प्रेयसीच्या घरात प्रियकराचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:58 PM2019-06-18T17:58:32+5:302019-06-18T18:00:15+5:30

प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

 Lover's girlfriend in a girlfriend's house | प्रेयसीच्या घरात प्रियकराचा गळफास

प्रेयसीच्या घरात प्रियकराचा गळफास

राहुरी : प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या पे्रयसीला अटक केली आहे़ तालुक्यातील मानोरी येथे १५ जून रोजी दुपारी ही घटना घडली़
शरद सर्जेराव चव्हाण (वय ३१ रा़ बºहाणपूर ता़ नेवासा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ या घटनेनंतर मयताचा भाऊ संतोष उर्फ सतिश सर्जेराव चव्हाण (वय २८) याने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मयत भाऊ शरद चव्हाण हा शिर्डी-शिंगणापूर रोडवर वाहनचालक म्हणून काम करतो़ शरद याचे गेल्या तीन वर्षांपासून नंदिनी (रा़ मानोरी) नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. सदर मुलीने शरद यांचे विरुध्द पूर्वी अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली होती़ त्यानंतर नंदिनी ही आमच्या घरी येऊन आम्हास शिवीगाळ करून बदनामी करत होती. तसेच हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी ती आमच्या कुटुंबीयांकडून दीड लाख रूपयांची मागणी करत होती. तेव्हा माझी आई सरस्वती यांनी सन २०१८ रोजी नंदिनी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ती माझा मयत भाऊ शरद चव्हाण यास वारंवार फोन करुन त्यास पैशाची मागणी करून सोबत रहा असा आग्रह धरत होती़ तसेच घरी येऊन त्रास देत होती़ या कारणामुळे शरद हा तिचेसोबत शिर्डी येथे तीन वर्षांपासून राहत होता़ तो घरी आला की, नंदिनी मला खूप त्रास देत आहे़ पैशांसाठी आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, असे सांगत असे़
दिनांक १५ जून रोजी दुपारचे सुमारास राहुरी पोलीस ठाणे येथून फोन आला व त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा शरद याने मानोरी येथे नंदिनी हिचे मानोरी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी नंदिनीवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक गणेश शेळके हे पुढील तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे़

प्रेमप्रकरणातून मुलाची आत्महत्या
श्रीगोंदा : बांगर्डे येथील अजित शेळके या विद्यार्थ्याने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ एप्रिलला घडली होती. तब्बल महिनाभरानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत अजितचे वडील संजय धोंडिबा गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित हा घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याचे गावातील एका मुलीशी सूत जुळले होते. दीड महिन्यांपूर्वी अजितला मुलीच्या वडिलांनी दमबाजी केली होती. त्यामुळे त्याने घाबरून आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Lover's girlfriend in a girlfriend's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.