भारदे हास्कूलमध्ये अल्पखर्ची विज्ञान साहित्य निर्मिती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:29+5:302021-08-20T04:26:29+5:30
शेवगाव : येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये विज्ञान विषय समितीचे माजी गुणवंत विद्यार्थी व अगस्त्य फाउंडेशनचे समन्वयक अक्षय कुलकर्णी यांच्या ...
शेवगाव : येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये विज्ञान विषय समितीचे माजी गुणवंत विद्यार्थी व अगस्त्य फाउंडेशनचे समन्वयक अक्षय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पखर्ची विज्ञान उपकरण निर्मिती कार्यशाळा पार पडली.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यशाळेत प्रकाश, ऊर्जा, विद्युत, ध्वनी, गुरुत्वाकर्षण या संकल्पनांवर आधारित उपकरणाची निर्मिती कशी करावी, याचे मार्गदर्शन करत त्यांनी क्लिष्ट नियम, संकल्पना सोप्या करून सांगितल्या. दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. विज्ञान विषय समितीचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या कार्यशाळेसाठी विज्ञान शिक्षक कन्हैय्या भंडारी, अभिषेक जोशी, सविता रोडी, अनिल ससाणे, सतीश जगदाळे यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेला
हरीश भारदे व प्राचार्य मदन मुळे यांची विशेष उपस्थिती होती.
-----
१९ भारदे स्कूल
भारदे हायस्कूलच्या सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अगस्त्य फाउंडेशनचे अक्षय कुलकर्णी.