निष्ठेने काम केल्यास फळ मिळते
By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:59+5:302020-12-08T04:17:59+5:30
करंजी : तुम्ही कोणत्या पक्षाचे, संघटनेचे काम करता याला महत्त्व नसून कोणतेही काम निष्ठेने व प्रामाणिकपणे केल्यास त्याचे फळ ...
करंजी : तुम्ही कोणत्या पक्षाचे, संघटनेचे काम करता याला महत्त्व नसून कोणतेही काम निष्ठेने व प्रामाणिकपणे केल्यास त्याचे फळ मिळते, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाठक यांनी व्यक्त केले. प्रकाश शेलार यांची नुकतीच युवक काँग्रेसच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा राजेंद्र पाठक मित्रमंडळाच्या वतीने करंजी येथे सन्मान करण्यात आला. कोणत्याही पक्षात, संघटनेत निष्ठेने काम केल्यास पक्ष व संघटनाच नाही, तर समाजही त्याची दखल घेऊन त्याचे फळ कार्यकर्त्यास मिळते. त्यामुळेच प्रकाश शेलार यांची सामाजिक कार्याची धडपड पाहून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली. करंजी परिसरासाठी त्यांची निवड भूषणावह असल्याचे पाठक म्हणाले. यावेळी मिठूभाऊ पाठक, भाऊसाहेब पाठक, बाळासाहेब गिते, बाबासाहेब जोगदंड, राजू गायकवाड, सुभाष क्षेत्रे, मल्हारी शिपणकर आदी उपस्थित होते.
फोटो : ०७ करंजी निवड