उत्तर प्रदेशातील साईभक्तांची लखनऊ ते शिर्डी सायकल वारी; रोज करतात ४० किलोमीटरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:21 PM2019-10-23T13:21:47+5:302019-10-23T13:22:22+5:30
शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वारी येथून सायकलवर जात असताना त्यांचेशी संवाद साधला.
रोहित टेके ।
कोपरगाव : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वारी येथून सायकलवर जात असताना त्यांचेशी संवाद साधला.
उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ जिल्ह्यातील शहाजापूर येथील अखिलेशकुमार मिश्रा, राजेश मिश्रा, राजेंद्र मिश्रा व अवदेश मिश्रा या चार साई भक्तांनी साईबाबांना नवस केला होता. तो पूर्ण झाल्यानंतर मागील महिन्यात (दि.१८) सप्टेंबर रोजी वरील चारही साईभक्त आपापल्या सायकलवर महिनाभर पुरेल एवढी शिदोरी तसेच कपडे व जीवनावश्यक वस्तुंचे गाठोडे टाकून शिर्डीच्या दिशेने साईबाबांचे नामस्मरण करीत निघाले. दररोज सायकलवर ३५ ते ४० किमीचा प्रवास करून रस्त्यात येणा-या एखाद्या गावातील मंदिरात रात्री थांबून जेवण तयार करून खाल्यानंतर रात्री आराम करायचा. दुसºया दिवशी पुन्हा दैनंदिनी सुरु करायची. असा महिनाभराचा प्रवास सुरु होता.
नवीन टायर टाकले
प्रवासादरम्यान वरील चौघांच्या सायकलच्या टायरचे एक- एक जोड झिजला असून त्यांना पुन्हा नवीन टायर टाकावे लागले. मंगळवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील वारी येथून शिर्डीला जात असताना प्रवासादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र ग्रामस्थांनी त्यांना मदत केली. त्यानंतर ते शिर्डीच्या दिशेने रवाना झाले.