हिरव्या हिरव्या रानात...हरणांचा मुक्त संचार....अळकुटी परिसरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:32 PM2020-06-22T12:32:53+5:302020-06-22T12:41:52+5:30
अळकुटी (ता. पारनेर) : अळकुटी गावांच्या पश्चिम भागात माळरानावर गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने माळरानावर हिरवा शालू पसरला आहे. याच निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंद घेण्यासाठी लोक माळावर सकाळ व संध्याकाळी परावर येतात. हरणाचे हे कळप पाहून लोकांनाही आनंदाचे भरते आले आहे.

हिरवाईने नडलेल्या निसर्गरम्य वातावरणात. गेल्या काही दिवसांपासून हरणांनी मुक्तपणे हजेरी लावली आहे. अळकुटीकर एक आगळावेगळा निसर्गरम्य वातावरणाबरोबर हरणांच्या कळपाचा रेलचेल दिसते आहे. हरणांच्या या आगमनाचा सुखद आनंद अनुभवत आहे. हरणं ही अळकुटीकरांनासाठी एक कुतुहलचा विषय बनला आहे. अनेक जेष्ठ व तरूण मंडळी माळावर येत असल्याने हरणांच्या दर्शनाने मनाला एक छान अनुभूती मिळते आहे. त्यामुळे अनेकांची पाऊल आता मोकळी हवा घेण्यासाठी माळावर येत आहेत. त्याच बरोबर वन्यप्राण्याचे होणारे दर्शनाने एक छान अनुभूती मिळते आहे.
--
आम्ही नेहमी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले काही दिवसापासून इथे येत आहोत. या परिसरात हरणांचे दर्शन होत आहे. त्यामुळे अळकुटीकरांना एक आगळा वेगळा अनुभव येतो.
-दिनेश भास्करराव शिरोळे
नागरिक अळकुटी