व-हाडाच्या लक्झरी बसला अपघात : 17 जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 05:55 PM2019-04-22T17:55:13+5:302019-04-22T17:55:33+5:30
मुबंईहून लग्न समारंभ उरकून यवतमाळकडे परतना-या व-हाडाच्या लक्झरी बसला पाठीमागून आलेल्या मालट्रकने दिलेल्या जोराच्या धडकेने झालेल्या अपघातात 17 जण जखमी झाल
हळगाव : मुबंईहून लग्न समारंभ उरकून यवतमाळकडे परतना-या व-हाडाच्या लक्झरी बसला पाठीमागून आलेल्या मालट्रकने दिलेल्या जोराच्या धडकेने झालेल्या अपघातात 17 जण जखमी झाले. एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात आज पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवित हानी टळली. मुंबईहून लग्न समारंभ आटपून यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या गावी परतणा-या व-हाडी मंडळींच्या लक्झरी बसला शिर्डी- हैद्राबाद मार्गावरील जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात भल्या पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त लक्झरी बसला जामखेडहून पाटोदामार्गे यवतमाळकडे जायचे होते. परंतु या बसचा रस्ता चुकल्याने ही बस शिर्डी-हैद्राबाद मार्गाने चालली होती. बस जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात आली असता लक्झरी चालकाने बस थांबवून रस्ता विचारण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान याचवेळी जामखेडकडून खर्ड्याच्या दिशेने जाणा-या मालट्रकने लक्झरी बसला (क्रमांक एम. एच.- 01, ए.एन. 8097) पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत लक्झरीची पाठीमागील बाजूचा चुराडा झाला. सुनंदा देविदास सावतकर (वय 45), राधाबाई वसंत सावतकर (पारडी, चुरमुरा उमरखेड), सुकशेन गौतम मुनेश्वर (वय 30), स्नेहल संदिप शिंगलकर (वय 6), शारदा सुभाष शिंगलकर (वय 40), केरबा पुंडलिक मुनेश्वर (वय 62), उमेश रमेश वाघमारे (वय 17), संदिप दिलीप सावते (वय 17), कुणाल विलास मुनेश्वर (वय 13), राजु देवानंद जाधव (वय 17), कमलबाई किसन मुनेश्वर (वय 72), आदित्य सुभाष शिंगलकर (वय 8), आनंद अरविंद मुनेश्वर (वय 25), रामचंद्र देवानंद जाधव (वय 26), राहूल यशवंतराव मुनेश्वर (वय 23), लक्ष्मीबाई विठ्ठल मुनवर (वय 64), ट्रक चालक गफ्फार पठाण (वय 36) हे सतरा जण जखमी झाले आहेत. अपघात प्रकरणी लक्झरी चालक रमेश दत्तराव जाधव (वय 49 रा नागसवाडी ता उमरखेड जि यवतमाळ) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक गफ्फार बाबुखान पठाण (रा येनकुर ता. भालकी जि. बिदर ( कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे हे करत आहेत.