मजुरांसाठीही येते आलिशान कार! फळबाग काम करणाऱ्या मजुरांना ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 06:46 AM2022-11-10T06:46:49+5:302022-11-10T06:47:03+5:30

एक काळ असा होता की, केवळ एखाद्या साहेबाला ने-आण करण्यासाठी मोटारगाडी असायची.

Luxury car comes for laborers too Achche Din to Orchard Laborers | मजुरांसाठीही येते आलिशान कार! फळबाग काम करणाऱ्या मजुरांना ‘अच्छे दिन’

मजुरांसाठीही येते आलिशान कार! फळबाग काम करणाऱ्या मजुरांना ‘अच्छे दिन’

बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा (जि. अहमदनगर):

एक काळ असा होता की, केवळ एखाद्या साहेबाला ने-आण करण्यासाठी मोटारगाडी असायची. पण, काळ बदलला असून शेतामध्ये शेतमजुरांची कमतरता भासू लागल्याने मजुरांना कामावर ने-आण करण्यासाठी बागायतदार आलिशान कार घेऊन मजुरांच्या दारात जात असल्याचे आजचे चित्र आहे. मजुरांच्या गरजेनुसार त्यांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली असून शेतात गेले की, पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही  दिला जात आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे ऊस फळबागांमध्ये वाढ झाली आहे. युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला.  तशी तसा शेतात काम करणाऱ्या मजुरांची टंचाई निर्माण झाली.  

द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर ‘धोका’ पत्करून करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल  मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. मजुरांच्या श्रमाला चांगलीच प्रतिष्ठा मिळाली.

Web Title: Luxury car comes for laborers too Achche Din to Orchard Laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.