जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:53 PM2019-04-21T12:53:57+5:302019-04-21T13:21:49+5:30

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले.

Madhavrao Mule, former president of District Maratha Institute passed away | जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन

जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले. ते ‘आबा’ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली. 
नगर तालुक्यातील वाटेफळ या छोट्याशा गावात माधवराव मुळे यांचा १९३२ साली जन्म झाला.  त्यांनी गावातच किराणा दुकान सुरु केले. १९४७ साली झालेल्या रझाकार चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर १९५२ मध्ये नगरमध्ये येत आडत व्यवसाय सुरु केला. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय झाले. या कालावधीत डाव्या विचारांशी जोडले गेले. १९५८ मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर नगर तालुका बाजार समितीची निवडणूक लढवली. १९६० नगर तालुका बाजार समितीचे सभापती झाली. बाजार समितीची दगडी कमान त्यांनी स्वत: बैलगाडीतून दगड आणून उभारली. माळीवाडा भागातून १९६७ साली नगरपालिकेची निवडणूक लढवली. इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष पदही भुषविले. त्यानंतरअहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेच्या शिवाजी ग्राहक भांडारचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९८० साली संस्थेचे सहसचिव झाले. १९८४ मध्ये डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मानद सचिव म्हणून काम पाहिले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १९८५ संचालक होते. त्यानंतर जिल्हा मराठा संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. १९९० मध्ये विधानसभेचे जनता दलाच्या तिकिटावर नगर-नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हॉटेल व्यवसायातही उतरले. अनेक परदेश दौरेही त्यांनी केले. १० एप्रिल २०१२ रोजी ते जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष झाले. सलग ६ वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. 
माधवराव मुळे यांचे पार्थिव संस्थेच्या आवारात आज सायंकाळी ५ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

Web Title: Madhavrao Mule, former president of District Maratha Institute passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.