मंडलाधिकारी लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:18 AM2018-06-13T11:18:09+5:302018-06-13T11:18:28+5:30
प्लॉटच्या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव यशवंत कवडे यास १४ हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
कोपरगाव : प्लॉटच्या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव यशवंत कवडे यास १४ हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील कुंभारी येथील एका रहिवाशाने नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने त्यांचे आई,भाऊ व स्वत:चे नावे ३ प्लॉट खरेदी केले असून त्याचे खरेदी खताची नोंदणी होऊन ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव यशवंत कवडे यांनी तक्रारदाराकडे १४ हजार रुपयांची लाच मागितली होती. मंगळवारी कवडे यास लाचघेताना सापळा लावून रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.