"वसंतरावांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली अन्..."; ग्रहमान ठीक नसल्याचे म्हणत सुजय विखेंनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 03:45 PM2024-11-09T15:45:27+5:302024-11-09T15:48:50+5:30

भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारसभेत बोलताना सुजय विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Speaking at a campaign meeting in Ahilyanagar Sujay Vikhe has expressed his feelings | "वसंतरावांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली अन्..."; ग्रहमान ठीक नसल्याचे म्हणत सुजय विखेंनी व्यक्त केल्या भावना

"वसंतरावांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली अन्..."; ग्रहमान ठीक नसल्याचे म्हणत सुजय विखेंनी व्यक्त केल्या भावना

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे.  त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान, अहिल्यानगरमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या माजी खासदार सुजय विखे यांच्या एका सभेमुळे राज्यातलं वातावरण चांगलेच तापलं होतं. सुजय विखे यांच्या सभेदरम्यान भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याप्रकरणी देशमुख यांना अटक देखील झाली. मात्र आता त्यानंतर सुजय विखे यांनी एका सभेत केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरवले. संगमनेर मतदारसंघासाठी सुजय विखे आग्रही होती. मात्र भाजपने त्यांना शेवटपर्यंत उमेदवारी दिली नाही. त्यानंतर आता सुजय विखे यांनी एका जाहीर सभेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, असं विखे म्हणालेत.  

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारसभेत सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका करत महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन केलं. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या राजकारणाविषयी सुद्धा भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नसल्याच, सुजय विखे पाटील म्हणाले. 

"लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला. माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली," अशी मिश्किल विधान सुजय विखेंनी केलं.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Speaking at a campaign meeting in Ahilyanagar Sujay Vikhe has expressed his feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.