विकासासाठी महायुतीचे सरकार गरजेचे: पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 01:05 PM2024-11-09T13:05:33+5:302024-11-09T13:06:03+5:30

चिचोंडी येथे शिवाजी कर्डिले यांच्यासाठी प्रचारसभा

maharashtra assembly vidhan sabha election 2024 mahayuti govt is essential for development said pankaja munde | विकासासाठी महायुतीचे सरकार गरजेचे: पंकजा मुंडे

विकासासाठी महायुतीचे सरकार गरजेचे: पंकजा मुंडे

लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळ चिचोंडी : केंद्रात भाजप मित्र पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यातही महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत 'फेक नॅरेटिव्ह' तयार केले गेले; मात्र आता राज्याचा विकास साधण्यासाठी 'फेक नॅरेटिव्ह'ला बळी न पडता महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मागे उभे राहा, असे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी शुक्रवारी दुपारी प्रचारसभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील, मतदारसंघाचे प्रभारी महेंद्रभाई पटेल, आमदार मोनिका राजळे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिंदेसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सत्यजित कदम, अक्षय कर्डिले, राजूभाऊ शेटे, धनराज गाडे, सुरेश बानकर, बाबा राजगुरू, सीमाताई ठोंबरे, नामदेवराव ढोकणे, विक्रमराव तांबे, भाऊसाहेब बर्फ, डॉ. मृत्युंजय गर्ने, बाबा राजगुरू, विलास गजभिव, काशीनाथ पाटील लवांडे, अहिल्यानगर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, बाळासाहेब अकोलकर, संभाजी पालवे, पुरुषोत्तम आठरे, शिवाजीराव पालवे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, शिवाजी कर्डिले हे कामाचा माणूस आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी कधी वयाचाही विचार केला नाही. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले. मुंडे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव विकासकामे झाली; परंतु लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून 'फेक नॅरेटिव्ह' तयार केले गेले. त्याचेच मी आणि डॉ. सुजय विखे आम्ही बळी ठरलो. सुजय विखे यांनी मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी आणला; परंतु 'फेक नॅरेटिव्ह'ने एका चांगल्या कर्तृत्ववान नेतृत्वाला घरी बसविले.

आमदार नसूनही विकासकामे केली... 

शिवाजी कर्डिले म्हणाले, आमदार, मंत्री असतानाही मागील पाच वर्षात त्यांना विकासकामे करता आली नाहीत. आता महायुती सरकारने निधी देताना भेदभाव केल्याचा आरोप निष्क्रियता झाकण्यासाठी विरोधक करत आहेत. मी आमदार नसतानाही पाच वर्षे मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहिलो.

२३ नोव्हेंबरलाच बोलू... 

माजी खासदार डॉ. सुजय विखे- पाटील म्हणाले, उगाच एखाद्या व्यक्तीवर बोलून त्याचे महत्त्व वाढविण्याची गरज नाही. आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे २३ नोव्हेंबरला कामातूनच बोलू.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 mahayuti govt is essential for development said pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.