कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:16 PM2020-05-20T14:16:24+5:302020-05-20T14:19:30+5:30

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे.

Maharashtra best in garbage free clean city; Three Star Renting to Sainagari this year | कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

प्रमोद आहेर / 
    शिर्डी : केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे. देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे.
देशपातळीवरील सर्वोत्तम १४१ कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील तब्बल ७६ शहरांचा समावेश आहे. यात नवी मुंबई या एकमेव शहराने फाईव्ह स्टार, ३४ शहरांनी थ्री स्टार तर ४१ शहरांनी सिंगल स्टार रेटींग पटकावले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत राज्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.
गेल्या तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही साईनगरीने स्वच्छतेतील आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शिर्डी नगरपंचायतीने थ्री स्टारमध्ये स्थान पटकावले आहे. माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील शिर्डी नगरपंचायतीने स्वच्छतेत राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे आपली गुणवत्ता कायम राखली आहे. शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्षा अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्वच्छतेत अव्वल राहण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा केली.
शिर्डी, देवळाली प्रवरा थ्री स्टार; नगर, संगमनेर सिंगल स्टार
नाशिक विभागात शिर्डी, देवळाली प्रवरा या नगरपालिका तर धुळे व जळगाव महापालिकांनी थ्री स्टारचा दर्जा मिळवला आहे. याशिवाय अहमदनगर व नाशिक महापालिकांसह जामनेर, रावेर, शहादा, संगमनेर, शिरपूर, वारणगाव व भगुर यांनी सिंगल स्टारचे मानांकन मिळविले आहे.
राज्यातील थ्री स्टार रेटींग शहर असे-
अंबरनाथ, भिवंडी-निझामपूर, ब्रम्हापुरी, चंद्रपूर, देवळाली प्रवरा, धुळे, गडहिंग्लज, इंदापूर, जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, कराड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, माऊदा, मिरा-भार्इंदर, मुरूड, नारखेल, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, सासवड, शिर्डी, तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला व वीटा या गावाचा समावेश आहे.


साईनगरी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. काही वर्षापूर्वी येथील अस्वच्छतेबाबत मनात सल होती़. अस्वच्छतेचा कलंक धुवून काढण्यासाठी पदाधिकारी व प्रशासनाने मनापासून कष्ट केले. नागरिकांनी यासाठी पुरेपूर साथ दिली. साईनगरी साईबाबांबरोबरच स्वच्छतेचेही प्रतिक व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे़, असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. 
 

Web Title: Maharashtra best in garbage free clean city; Three Star Renting to Sainagari this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.