पारनेर तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:11 AM2018-08-09T10:11:39+5:302018-08-09T13:59:39+5:30
मराठा आरक्षणासाठी पारनेर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
पारनेर : मराठा आरक्षणासाठी पारनेर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
पारनेर तालुक्यातील शाळा, महाविद्यालय,बँका, पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या असून बससेवाही ठप्प आहे. तालुक्यातील राळेगणसिद्धी, जवळे, निघोज, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, वडझिरे, आळकुटी, कान्हूरपठार, जामगाव, पळवे या गावांसह इतर गावांमध्ये सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तालुक्यात सर्वत्र शांततेत आंदोलन सुरू आहे. तहसीलदार भारती सागरे, नायब तहसीलदार रमेश काथवटे, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, सुपा पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आंदोलनाचा आढावा घेत आहेत. पारनेर शहरातील आंबेडकर चौकात रास्ता रोको करून फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग होता.