मुख्यमंत्री जनता ठरवेल, महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही; अमोल कोल्हेंची सेना-भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 11:49 AM2019-08-07T11:49:23+5:302019-08-07T12:46:02+5:30

भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी त्यांची लढाई सुरु आहे.

Maharashtra does not ship to anyone: Dr. Amol Kolhe | मुख्यमंत्री जनता ठरवेल, महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही; अमोल कोल्हेंची सेना-भाजपावर टीका

मुख्यमंत्री जनता ठरवेल, महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही; अमोल कोल्हेंची सेना-भाजपावर टीका

अहमदनगर: भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी त्यांची लढाई सुरु आहे. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही, असे मत डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला अहमदनगरमधून सुरुवात झाली. या यात्रेच्या शुभारंभावेळी डॉ.कोल्हे बोलत होते.

कोल्हे म्हणाले, दुष्काळ व पुरग्रस्त यांना मदत न करता मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून यात्रा काढत आहेत. या यात्रा केवळ निवडणुकीसाठी काढल्या आहेत. सरकारने गेल्या पाच वर्षात काय काम केले, असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीरच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. लोकशाहीमध्ये असे निर्णय घेणे घातक आहे. जीएसटी लागू केल्यानंतर दहशतवाद पुर्णपणे संपला असे सरकार म्हणत होते. पण खरोखरच दहशतवाद संपलाय का ? एव्हीएमबाबत सर्वांनाच संभ्रम आहे.

संग्राम जगताप यांची लोकसभेवेळीची रॅली आणि मिळालेली मते यामध्ये फरक का दिसतोय ? सर्वसामान्य जनतेला देखील संशय आहे. मग सर्वांनाच संभ्रम आहे तर मग सरकारने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला काय हरकत आहे. राष्ट्रवादीतील पडझडीबद्दल कोल्हे म्हणाले, पवार साहेबांच्या विचारांवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. वरची वीट ढासळली म्हणून खालची वीट ढासळत नाही. नेते गेले असले तरी कार्यकर्ते पक्षातच आहेत आणि त्यांचा पक्षावर विश्वास आहे. एकेकाळी राष्ट्रवादीत फक्त सहाच आमदार होते. त्याचे ६० झाले हा इतिहास आहे. मग कोणीही सोडून गेले त्याने फरक पडत नाही. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार नक्की येईल.

Web Title: Maharashtra does not ship to anyone: Dr. Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.