Maharashtra Government: आमदार लहामटे यांना होती मंत्रिपदाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:29 AM2019-11-24T05:29:40+5:302019-11-24T05:30:03+5:30
अकोले मतदारसंघातील आमदार डॉ. किरण लहामटे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शनिवारी अजित पवारांकडून झाला. मात्र, त्यांच्याशी संपर्क टाळून व आपले लोकेशन दडवून ठेवत लहामटे हे मुंबईत पक्षाच्या बैठकीत पोहोचण्यात यशस्वी झाले.
- सुधीर लंके
अहमदनगर : अकोले मतदारसंघातील आमदार डॉ. किरण लहामटे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शनिवारी अजित पवारांकडून झाला. मात्र, त्यांच्याशी संपर्क टाळून व आपले लोकेशन दडवून ठेवत लहामटे हे मुंबईत पक्षाच्या बैठकीत पोहोचण्यात यशस्वी झाले.
लहामटे यांच्याशी अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. लहामटे यांनी या एकाही कॉलला प्रतिसाद दिला नाही. कालांतराने भ्रमणध्वनीच बंद करत ते नॉट रिचेबल झाले. त्यामुळे अजित पवारांच्या यंत्रणेने त्यांच्यासोबत असलेल्या विनय सावंत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ‘अजित दादांना आमदारांशी बोलायचे आहे. आमचे आमदारांशी बोलणे करुन द्या. त्यांना मंत्री करावयाचे आहे’ अशी थेट आॅफर समोरुन देण्यात आली. लहामटे हे सध्या कोठे आहेत? हे लोकेशनही शोधण्याचा प्रयत्न समोरुन झाला. मात्र, सावंत यांनीही यास प्रतिसाद न देता आपला भ्रमणध्वनी बंद केला. त्यामुळे लहामटे यांच्याशी संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरले.