राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:25+5:302021-03-31T04:20:25+5:30

राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनच्यावतीने २४ ते २७ मार्चदरम्यान ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. क्रीडा मंत्रालयाने योगासनांना ...

Maharashtra tops national yoga competition | राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनच्यावतीने २४ ते २७ मार्चदरम्यान ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. क्रीडा मंत्रालयाने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सहा गटांमध्ये घेण्यात आलेल्या योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये त्रिपुरा राज्य व मध्यप्रदेशच्या संघाने प्रत्येकी एक रौप्य, पश्‍चिम बंगालच्या संघाने दोन कांस्य, तर हरियाणा व तेलंगणा येथील संघाने प्रत्येकी एका कांस्य पदकाची कमाई केली. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या पहिल्याच स्पर्धेला देशभरातील विविध राज्यांतील संघांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

लहान गटात महाराष्ट्राच्या संघातील प्रीत नीलेश बोरकरने ७४.३३ गुणांसह सुवर्णपदक मिळविले. त्रिपुराच्या रेहान आलम याने ७३.०८ गुणांसह रौप्य, हरियाणाच्या दिपांशूने ७२.५० गुणांसह कांस्य पदक पटकावले. याच वयोटातील मुलींमध्ये तामिळनाडूच्या नव्व्या सत्या हरिश हिने ८१.९२ गुणांसह सुवर्ण, महाराष्ट्राच्या तृप्ती रमेश डोंगरेने ८१.७५ गुणांसह रौप्य, तर पश्‍चिम बंगालच्या सावली गांगुली हिने ८०.५८ गुणांसह कांस्य पदक मिळविले.

मुलांच्या मध्यम गटातही महाराष्ट्र संघाचीच छाप दिसून आली. या गटात नितीन तानाजी पवळे याने ७९.०७ गुण मिळवित सुवर्णपदक, त्यापाठोपाठ जय संदीप कालेकर याने ७८.४८ गुण मिळवतांना रौप्य, तर कर्नाटकच्या आदित्य प्रकाश जंगम याने ७७.९३ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली. याच गटात महाराष्ट्राच्या ओम महेश राजभर याने ७७.७५ गुणांसह चौथे मानांकन मिळविले. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मृणाली मोहन बाणाईतने ८७ गुण प्राप्त करीत सुवर्ण पदक, तर सेजल सुनील सुतार हिने ८७.१७ गुणांसह रौप्यपदक पटकावले. तेलंगणाच्या विरपा रेड्डी लिथिका हिने ८०.१७ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली, तर महाराष्ट्राच्या तन्वी भूषण रेडीजने ७९.६७ गुणांसह पाचवे मानांकन मिळविले. मुलांच्या मोठ्या गटात कर्नाटकच्या मोहंमद फिरोज शेख याने ७९.१७ गुणांसह सुवर्ण, तामिळनाडूच्या पी. जीवनाथनने ७६.८३ गुणांसह रौप्य, तर गुजरातच्या प्रतीक बालूभाई मेवाडा याने ७५.४२ गुणांसह कांस्य पदक मिळविले. याच वयोगटातील मुलींमध्ये गुजरातच्या पूजाबेन घनश्यामभाई पटेल हिने ७८.१८ गुणांसह सुवर्ण, मध्यप्रदेशच्या सपना छोटेलाल पाल हिने ७५.७३ गुणांसह रौप्य, तर पश्‍चिम बंगालच्या अनन्या बिश्‍वास हिने ७२.४९ गुणांसह कांस्यपदक पटकावले. या गटात महाराष्ट्राच्या क्षितीज सुहास पाटील याने ७०.०१ गुण मिळवून चौथे मानांकन मिळविले.

या स्पर्धेत देशभरातील ५ हजार ३२८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील ४९८ स्पर्धक राज्यांचे प्रतिनिधीत्व करत राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांना स्पोर्ट्स ॲथोरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल संदीप प्रधान यांच्या उपस्थितीत महासंघाचे अध्यक्ष डॉ. ईश्‍वर बसवरेड्डी व महासचिव डॉ. जयदीप आर्य यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली.

Web Title: Maharashtra tops national yoga competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.