Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वत: उभे नाही राहू शकले'; सत्यजीत तांबेंचा विखे पाटलांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:32 PM2024-10-29T18:32:36+5:302024-10-29T18:33:06+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्यात आला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून संगमनेर विधानसभा चर्चेत आहे. भाजापचे नेते सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघात संपर्क दौरा सुरू केला होता. विखे पाटील या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटली आहे. दरम्यान, संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमोल धोंडीबा खताळ यांना रिंगणात उतरवले आहे.
"त्या उमेदवाराला पराभूत करू"; अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात सोमय्यांनी थोपटले दंड
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना दक्षिण नगर मतदारसंघात उमेदवारी दिली होती. पण त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मोठा पराभव केला. यामुळे सुजय विखे पुन्हा एकदा विधानसभेसाठी तयारी करत होते. पण ही जागा आता शिंदे गट लढवणार आहे. दरम्यान, आता यावरुन आमदार सत्यजीत तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
"आपल्याला वाटत असेल उमेदवार डमी आला, उमेदवार डमी आला नाही. आपली लढाई त्या उमेदवाराच्या कोण आहे त्यांच्या बरोबर आहे. आपली लढाई त्या उमेदवाराच्या मागे असणाऱ्या विखे पाटील यांच्याबरोबर आहे. अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वत: उभे राहू शकले नाहीत,असा निशाणा आमदार सत्यजीत तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर साधला.
दोन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलच पेटले. राजकीय वर्तुळातून आरोप -प्रत्यारोप सुरू झाले. त्याच दिवशी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. शुक्रवारी रात्री १० वाजता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरू झालेले आंदोलन सकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर येथेच शनिवारी सकाळी १० वाजता पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
यावेळी विधानसभा निवडणुकीत विखे पाटील विरुद्ध थोरात असा सामना जोरदार रंगणार असल्याचे दिसत आहे.