महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले-रोहित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:20 PM2020-01-17T14:20:30+5:302020-01-17T14:22:23+5:30
संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार पवार बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पवार पुढे म्हणाले, ज्या कुटुंबात आम्ही जन्मलो. त्याचा आम्हाला आनंद आहे. पुढे काय करायचे हे ठरवावे लागेल. घरी दिवाळी, कोणताही सण असला तरी घरात मात्र समाजाचीच चर्चा आम्ही ऐकली. निवडणुकीच्या चर्चा ऐकल्या. त्यातून लोकांच्या अडचणी ऐकल्या. त्या कशा सोडविल्या याची चर्चा लहानपणापासून ऐकायला मिळाली. त्यामुळे आम्हाला त्यांचे विचार पटले. समजा आम्ही डॉक्टरच्या घरात जन्मलो असतो तर आम्हाला मेडीकलबद्दल, पेशंटबद्दल माहिती ऐकायला मिळाली असती. यामुळे आम्ही डॉक्टरच्या क्षेत्रात असतो. आमचे वडील वकील असते तर कायदेक्षेत्रात आम्ही गेलो असतो. पण आम्ही लहानपणापासून समाजकारण ऐकले. त्याची आम्हाला आवड निर्माण झाली. त्यामुळे मला समाजकारण करावे लागले. पुढच्या पाच वर्षात आम्हाला काम करावेच लागेल तरच जनता आमचा स्वीकार करील.
बारामती जवळची की कर्जत-जामखेड या अवधून गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, बारामती माझे जन्मगाव आहे. परंतु मला कर्जत-जामखेडने लढायला शिकविले. जे लढायला शिकविते ते मला जवळचे वाटते, असे ते म्हणाले.