राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलेला एका सुवर्णपदकासह चार पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 01:26 PM2019-09-29T13:26:00+5:302019-09-29T13:27:55+5:30
शिर्डी येथे सुरू असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुस-या दिवस महाराष्ट्राच्या महिला कुस्तीगीरांच्या तुफानी लढतींनी गाजवला. एकूण दहा वजन गटात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २५० पेक्षा जास्त मुलींनी विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. यात महाराष्ट्राच्या कुस्तीवीर रणरागीणींनी रविवारी एक सुवर्णपदकासह तब्बल चार पदके पटकावली.
शिर्डी : शिर्डी येथे सुरू असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुस-या दिवस महाराष्ट्राच्या महिला कुस्तीगीरांच्या तुफानी लढतींनी गाजवला. एकूण दहा वजन गटात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २५० पेक्षा जास्त मुलींनी विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. यात महाराष्ट्राच्या कुस्तीवीर रणरागीणींनी रविवारी एक सुवर्णपदकासह तब्बल चार पदके पटकावली.
राष्ट्रीय ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्या दुसरा दिवस महिला कुस्त्यांनी गाजला. महाराष्ट्रातील रेश्मा माने हिने ६५ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. स्वाती शिंदे हिने ५० किलो वजनगटात (कास्यपदक), अंकिता गुंड हिने ५९ किलो वजनगटात (कास्यपदक) मिळवून महाराष्ट्राचा स्पर्धेत दबदबा कायम राखला.
कुस्ती स्पर्धेतील विविध गटातील विजेते असे-
५० किलो वजन गट-ज्योती (हरियाना) सुवर्णपदक, प्रीती ( हिमाचल प्रदेश) कास्यपदक, खुशी (दिल्ली) रौप्यपदक, स्वाती (महाराष्ट्र) रौप्यपदक.
५३ किलो वजनगट-पूजा (दिल्ली) सुवर्णपदक, ममता (चंदीगड) कास्यपदक, पूजा (मध्यप्रदेश) रौप्यपदक, अनकुष (हरियाना) रौप्यपदक.
५५ किलो वजनगट-राणी राणा (मध्यप्रदेश) सुवर्णपदक, मानसी यादव (उत्तर प्रदेश) कास्यपदक, अर्पण प्रीत (पंजाब) रौप्यपदक, मिनाक्षी (चंदीगड )कास्यपदक.
५७ किलो वजनगट-पिंकी (हरियाणा) सुवर्णपदक, अंजू (चंदीगड) रौप्यपदक, स्वेता (कर्नाटक) कास्यपदक, भारती (उत्तरप्रदेश) कास्यपदक.
५९ किलो वजनगट-पूजा यादव (उत्तरप्रदेश) सुवर्णपदक, ममता (दिल्ली) रौप्यपदक, अंकिता (महाराष्ट्र) कास्यपदक, मनिषा (हरियाना) कास्यपदक.
६२ किलो वजनगट- रेश्मा माने (महाराष्ट्र) सुवर्णपदक, अनिता (दिल्ली) रौप्यपदक, लवलीन कौर (पंजाब) कास्यपदक, पूजा (हरियाना) कास्यपदक.
६५ किलो वजन गट-निशा (हरियाना) सुवर्णपदक, जसप्रीत कौर (पंजाब)रौप्यपदक, मनाली (महाराष्ट्र) कास्यपदक, बबीता राणा (उत्तरप्रदेश)कास्यपदक.
६८ किलो वजन गट- सुमन (हरियाना) सुवर्णपदक, रौनक (दिल्ली) रौप्यपदक, सुषमा (मध्यप्रदेश) कास्यपदक, अंशू (उत्तरप्रदेश) कास्यपदक.
७२ किलो वजन गट-नैना (हरियाना) सुवर्णपदक, रिना (दिल्ली) रौप्यपदक, सिमरनजीत कौर (पंजाब) कास्यपदक, अनेरी सोनकर (मध्यप्रदेश) कास्यपदक.
७६ किलो वजन गट -पूजा (हरियाना) सुवर्णपदक, नवज्योत कौर (पंजाब) रौप्यपदक, डॉली दीक्षीत (उत्तरप्रदेश) कास्यपदक, प्रिया (महाराष्ट्र) कास्यपदक.
टीम चॅम्पियनमध्ये हरियाना अव्वल
हरियाना - २०५ गुण, दिल्ली- १५४ गुण, उत्तर प्रदेश -१२३ गुण.