माझ्या गाडीत महाविकास आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:18+5:302021-04-06T04:20:18+5:30
पिंपळगाव जोगे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी खा. सुजय विखे यांना निवेदन दिले ...
पिंपळगाव जोगे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी खा. सुजय विखे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर खा. विखे यांनी अळकुटी येथे पिंपळगाव जोगा पाट पाणीसंदर्भात अळकुटी पाणी परिषद घेतली. या परिषदेत बोलताना विखे म्हणाले, आपला लढा आपणच उभारला पाहिजे. त्यासाठी पाणी वाटप संस्था गरजेची आहे. पुणे आणि नगर जिल्हा हे वाद जुनेच आहे. पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी वर्ग कमी असेल तर माझी यंत्रणा त्यांना दिली जाईल. जसे श्रीगोंदामध्ये केले तोच पॅटर्न येथेही राबवू. तालुक्यातील जनतेचे पाणी प्रश्न सोडवू. पाणी उच्च दाबाने आण्याचे काम माझे आहे. मला बाकी विषयावर बोलायचे नाही. लाभार्थी शेतकऱ्यांना वंचित नाही राहिले पाहिजे, हीच भूमिका आपली आहे. समाजाचे प्रश्न सोडण्यात मी समाधानी आहे. लाॅकडाऊनमुळे कुटुंबामध्ये निश्चित एकात्मता जाणवते आहे, असे विखे म्हणाले. याप्रसंगी सभापती गणेश शेळके, माजी जिल्हा परिषद विश्वनाथ कोरडे, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, माजी पंचायत समिती सदस्य डाॅ. भास्कर शिरोळे, राहुल शिंदे, सचिन वराळ, मंगेश लाळगे, अळकुटीचे सरपंच डाॅ. कोमल भंडारी, राहुल सुकाळे, राहुल गाडगे, रामदास कवडे, अरुण आवारी, निवृत्ती चौधरी, भाऊ डेरे, शरद घोलप, अरीफभाई पटेल, लता घोलप, मीराबाई शिरोळे, आनंद शिरोळे, पाटबंधारे अभियंता कडुसकर, सुधारक साळवे, महावितरणचे प्रशांत आडभाई आदी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन उत्तम घोलप यांनी केले, तर आभार डाॅ. भास्कर शिरोळे यांनी मानले.
.................
फोटो ०५ सुजय विखे अळकुटी
अळकुटी पाणी परिषदेत बोलताना खा. डाॅ. सुजय विखे.