राहुरी तालुक्यामधील ब्राम्हणी गावातील शेतक-यांचा महावितरणवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:29 PM2017-12-26T17:29:29+5:302017-12-26T17:31:40+5:30
अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे.
सध्या ऊस, कांदा लागवड सुरू आहे. अशा परिस्थिती परीसरातील पुर्व सुचना न देता गावातील दहा वीज रोहित्र बंद करण्यात आले. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांसह जनावरे तसेच माणसांची पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. थकीत वीज बील भरण्यास मुदत देण्यात यावी, तो पर्यत रोहित्र बंद करू नये. अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. महावितरणने वीज रोहित्र बंद करून शेतक-यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोपही संतप्त शेतक-यांनी केला आहे.
ठिय्या आंदोलनादरम्यान पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, उपसरपंच डॉ. बानकर, मोकाटे गुरुजी, रंगनाथ मोकाटे, महेंद्र तांबे, माणिक तारडे, ज्ञानदेव मोकाटे, तोलाजी नवाळे, जालू बानकर, केशव हापसे, शिवाजी राजदेव, चंद्रभान राजदेव, गोरक्ष शिंदे, उमाकांत हापसे, डॉ. काका राज देव, दादा ठुबे, अनिल ठुबे, जगन्नाथ वने, माणिक देशमुख, राम राजदेव, अजीत तारडे, संभाजी हापसे, एकनाथ वने, चंद्रभान राजदेव आदिंसह मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी होते.
शेतक-यांना अपमानास्पद वागणूक
आज मंगळवारी सकाळी एकत्रितपणे महावितरण कार्यालयाकडे जाण्यापुर्वी गावातील पदाधिका-यांसह काही शेतक-यांनी संबधित अधिका-यांना संपर्क केला. मात्र, जबाबदार अधिका-यांनी कार्यालयाकडे फिरकणे पसंत न करता शेतक-यांनाच भ्रमणध्वनीवरून उलटे बोलत अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
बील भरून गुन्हा केला का ? - संतप्त शेतक-यांचा सवाल
दहा वीज रोहित्रावरील बहुतेक वीज ग्राहकांनी विहीत मुदतीत वीज बील भरले आहे. वास्तविक महावितरणे संपुर्ण वीज रोहित्र बंद न करताना प्रामाणिकपणे वीज बील भरणा-यांचा कनेक्शन कट करण्यापुर्वी विचार करणे गरजेचे होते. त्यामुळे वीज बील भरून आम्ही गुन्हा केला का, असा सवाल शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.