कोविड केअरमध्ये महायज्ञ अंधश्रद्धा नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:13+5:302021-05-25T04:24:13+5:30

अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये केलेला महायज्ञ अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे, असे सांगून अंधश्रद्धा निर्मूलन समिती दुटप्पी भूमिका ...

Mahayagya is not superstition in Kovid Care | कोविड केअरमध्ये महायज्ञ अंधश्रद्धा नव्हे

कोविड केअरमध्ये महायज्ञ अंधश्रद्धा नव्हे

अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये केलेला महायज्ञ अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे, असे सांगून अंधश्रद्धा निर्मूलन समिती दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

पारनेर तालुक्यात स्व. वसंतराव झावरे यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोंविड केअर सेंटरध्ये झावरे यांनी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याबाबत झावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ते म्हणाले, कोरोनावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. अशा कठीण परिस्थितीत प्रत्येकजण रुग्ण बरे व्हायेत, यासाठी प्रार्थना करतो आहे. परमेश्वरावर श्रद्धा आहे म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केला. त्यात चुकीचे काही नाही. महायज्ञामुळे रुग्णांना एकप्रकारे समाधान मिळाले. त्यांच्या समाधानासाठीच हा यज्ञ केला गेला. आपल्या पाठीमागे परमेश्वर आहे, अशी भावना रुग्णांनी व्यक्त केली. त्यांच्यात एक विश्वास निर्माण झाला. काही सेंटरमध्ये तर नाचगाणे सुरू आहेत. महाराज येतात, चाटण देतात, मग अशा सेंटरबाबत कुणीच काही का बोलत नाही. अंनिसने अशा सेंटरबाबत तक्रारी का केल्या नाहीत. अंनिस एकतर्फी कारवाईची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीला राजकीय वास आहे, असे दिसते.

अध्यात्म हे एक विज्ञान आहे. यज्ञ, होमहवन हे शास्त्राला धरून आहे. यज्ञाच्या माध्यमातून प्रार्थना केली. प्रार्थना करणे जर गुन्हा असेल तर मी केला आहे. या मागणे कोविड सेंटरमधील रुग्णांना दिलासा देणे हाच हेतू होता. यापुढेही असे यज्ञ आयोजित करावे लागले तर ते केले जातील. कुणीही आमच्या श्रद्धेला हात घालू नये, असे झावरे यावेळी म्हणाले.

Web Title: Mahayagya is not superstition in Kovid Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.