संगमनेर नगर परिषदेत ‘महिला राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:19+5:302021-01-13T04:52:19+5:30

नगर परिषदेच्या सभागृहात विषय समित्यांचे सभापती, सदस्य तसेच स्थायी समिती सभापती व सदस्यांच्या निवडीकरिता विशेष सभा घेण्यात आली. सर्वच ...

'Mahila Raj' in Sangamner Municipal Council | संगमनेर नगर परिषदेत ‘महिला राज’

संगमनेर नगर परिषदेत ‘महिला राज’

नगर परिषदेच्या सभागृहात विषय समित्यांचे सभापती, सदस्य तसेच स्थायी समिती सभापती व सदस्यांच्या निवडीकरिता विशेष सभा घेण्यात आली. सर्वच सभापती, सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुनंदा मच्छींद्र दिघे, शिक्षण समितीच्या सभापतीपदी वृषाली श्याम भडांगे, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी मनीषा भुपेश भळगट, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सदस्यपदी मालती धनंजय डाके, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी शबाना रईस बेपारी यांची निवड करण्यात आली. सहापैकी पाच विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला नगरसेवकांची निवड झाली. नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष कुंदन जगन्नाथ लहामगे यांची निवड झाली. स्थायी समितीच्या सदस्यपदी उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, सुनंदा दिघे, वृषाली भडांगे, मनीषा भळगट, मालती डाके, शबाना बेपारी, दिलीप सहदेव पुंड, विश्वास रतन मुर्तडक, नसिमबानो इसहाकखान पठाण यांची निवड करण्यात आली. यात दहापैकी सात सदस्य या महिला आहेत.

या निवडीकरिता पीठासीन अधिकारी म्हणून संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरूळे यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी डाॅ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहायक कार्यालयीन निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सहकार्य केले.

Web Title: 'Mahila Raj' in Sangamner Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.