चेडेचांदगाव ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:20+5:302021-02-12T04:19:20+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोमल भाऊसाहेब कणसे यांची, तर उपसरपंचपदी उषा रमेश माने यांची ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोमल भाऊसाहेब कणसे यांची, तर उपसरपंचपदी उषा रमेश माने यांची बिनविरोध निवड झाली. येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराची दोरी पहिल्यांदाच महिलांच्या हाती आली आहे.
चेडेचांदगाव, सुळेपिंपळगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी बुधवारी बैठक झाली. सरपंचपदासाठी कोमल कणसे, तर उपसरपंचपदासाठी उषा रमेश माने यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते. या निवडीसाठी अभ्यासी अधिकारी म्हणून चौरे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रामसेवक जाधव यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्रीधर चेडे, द्रौपदी बोरुडे, शरद नागरे, भरत देशमुख, राहुल देशमुख, अशोक मासाळ, भाऊसाहेब मासाळ, उद्धव चेडे, सीताराम नागरे, आंबदास चेडे, भाऊसाहेब चेडे, श्रीधर चेडे, शहादेव बोरुडे, सुनील चेडे, सुभाष कणसे, जगन्नाथ पाटोळे, सखाराम बोरुडे, मनोहर चेडे, पोपट मासाळ, शिवाजी कणसे, तुळशीराम मासाळ, पंडित कांबळे, रामराव कणसे, सूर्यभान मासाळ, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी ११ चेडेचांदगाव
चेडेचांदगाव येथील सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.