पळवे बुद्रुक, खुर्दमध्ये महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:36+5:302021-02-11T04:22:36+5:30
पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक, खुर्द परिसरात सरपंचपदी महिलांना संधी मिळाली. पळवे खुर्दमध्ये सर्वसाधारण (महिला) राखीव आरक्षण ...
पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक, खुर्द परिसरात सरपंचपदी महिलांना संधी मिळाली.
पळवे खुर्दमध्ये सर्वसाधारण (महिला) राखीव आरक्षण होते. येथे सरपंचपदी सरिता गणपत जगताप तर उपसरपंचपदी संजय नवले यांची बिनविरोध निवड झाली. याच गटात माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर यांच्या पत्नी निवडून आल्याने त्यांनाही भविष्यात संधी मिळणार असल्याचे पॅनेल प्रमुख संजय तरटे यांनी सांगितले. संजय तरटे गटाच्या पाच जागा आल्याने सत्ता स्थापनेस त्यांनी दावा केला.
माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या पळवे बुद्रुकमध्ये अनेक वर्षे बिनविरोधचा फाॅर्म्युला चालत होता. परंतु, मागील दोन पंचवार्षिकपासून सरळ लढत होत आहे. यंदा गंगाराम कळमकर यांनी माजी सरपंच बाळासाहेब कळमकर यांच्याविरोधात पॅनेल उतरवून सातही जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता काबीज केली. सरपंचपदी तेजस्विनी कळमकर तर उपसरपंचपदी शिवाजी पळसकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडून आलेल्या प्रत्येकीला संधी देऊन गावाचा एकोपा टिकविणार असल्याचे पॅनेल प्रमुख गंगाराम कळमकर यांनी सांगितले.
भोयरे गांगर्डा येथे अनुसूचित जमाती महिलेचे आरक्षण होते. तेथे उमेदवारच नसल्याने ती जागा रिक्त ठेवून उपसरपंचपदी सुधीर पवार यांची निवड करण्यात आली. म्हसणे सुलतानपूर येथे डॉ. विलास काळे सरपंचपदी तर उपसरपंचपदी अनिल तरटे यांची बिनविरोध निवड झाली.
बाबुर्डी येथे सरपंचपदी प्रकाश बाबुराव गुंड तर सुजाता रवींद्र गवळी यांची उपसरपंचपदी निवड झाली. रुई छत्रपती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजया बंडू साबळे तर उपसरपंचपदी मीना बापूराव दिवटे यांची निवड केली. नारायणगव्हाण येथे मनीषा रामदास जाधव तर उपसरपंचपदी राजेंद भानुदास शेळके यांची निवड झाली.
जातेगाव सरपंचपदी संजय दादाभाऊ गायकवाड तर उपसरपंचपदी सोनाली ढोरमले यांची निवड जाली. पाडळी रांजणगावच्या सरपंचपदी विक्रमसिंह कळमकर यांची तर उपसरपंचपदी वैशाली देवराम करंजुले यांची बिनविरोध निवड झाली.