राहुरी पंचायत समितीत महिलाराज

By Admin | Published: September 14, 2014 11:07 PM2014-09-14T23:07:08+5:302024-03-26T14:13:16+5:30

राहुरी : राहुरी पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत असल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

Mahilaraj in Rahuri Panchayat Samiti | राहुरी पंचायत समितीत महिलाराज

राहुरी पंचायत समितीत महिलाराज

राहुरी : राहुरी पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत असल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सभापतीपद महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे सभापतीपदी मंगल निमसे यांची, तर उपसभापतीपदी मंदा डुक्रे यांची बिनविरोध निवड झाली़
उपजिल्हाधिकारी बी़ एऩ सैंदाने यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड घेण्यात आल्या. विरोधी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला़ सभापतीपदासाठी मंगल ज्ञानदेव निमसे यांच्या नावाची सूचना मावळते उपसभापती दिगंबर शिरसाट यांनी, तरउपसभापतीपदासाठी मंदा वसंत डुक्रे यांच्या नावाची सूचना दिनकर वैरागर यांनी मांडली़ विरोधी सभापतीपदाचे उमेदवार संगीता गोरक्षनाथ दुशिंग व उपसभापतीपदाचे उमेदवार सचिन भिंगारदे यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतल़े याशिवाय सत्ताधारी एकनाथ ढवळे यांनीही अर्ज भरला होता. परंतु ऐनवेळी त्यांनीही माघार घेतली. नूतन सभापती निमसे यांचा जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांच्या हस्ते, तर उपसभापती डुक्रे यांचा नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मावळते सभापती शिवाजीराव गाडे यांनी प्रास्ताविक केले़ राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले़ यावेळी उषाताई तनपुरे, अ‍ॅड़ सुभाष पाटील, डॉ़ उषाताई तनपुरे यांची भाषणे झाली़ यावेळी सुरेश करपे, शामराव निमसे, गोवर्धन घोलप, शारदा खुळे, गोरक्षनाथ नेहे, ज्ञानदेव निमसे, भाऊसाहेब देवरे, कांबळे, बाळासाहेब आढाव, मधुकर तारडे उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mahilaraj in Rahuri Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.