मका केंद्रावर फक्त ६८ शेतक-यांची मका खरेदी; २१८ जण प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:11 PM2020-07-12T17:11:41+5:302020-07-12T17:13:06+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मका हमी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांपैैकी अवघ्या ६८ शेतक-यांची मका खरेदी झाली. अद्यापही २१८ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.
श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मका हमी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतक-यांपैैकी अवघ्या ६८ शेतक-यांची मका खरेदी झाली. अद्यापही २१८ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.
खरेदी केंद्राची १५ जुलै रोजी मुदत संपत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, अशी तक्रार शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे यांनी केली आहे. पटारे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे.
मका खरेदी केंद्राची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. व्यापा-यांकडून मका खरेदी एक हजार ते चौदाशे रुपये क्विंंटलच्या दरामध्ये केली जात आहे. किमान आधारभूत दरापेक्षा ती ५०० रुपये कमी आहे. शासकीय हमी भाव केंद्रामुळे मकाची आधारभूत किंमत एक हजार ७५० रुपये आहे. बेलापूर केंद्रावर आॅनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या शेतक-यांकडून मका खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या ६८ शेतक-यांचे अद्यापही पैैसे मिळालेले नाहीत, असे पटारे यांनी निवेदनात म्हटले आहे.