बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत भटके कुत्रे सोडणार; वैतागलेल्या नगरकरांचा इशारा
By अरुण वाघमोडे | Updated: July 3, 2024 18:41 IST2024-07-03T18:41:47+5:302024-07-03T18:41:59+5:30
अहमदनगर : नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे. शहर तसेच उपनगरात ...

बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत भटके कुत्रे सोडणार; वैतागलेल्या नगरकरांचा इशारा
अहमदनगर : नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे. शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, मोठी माणसे जखमी झाली आहेत. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणेही कठीण झाले आहे. या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिकेच्या आवारात भटके कुत्रे आणून सोडले जातील, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आला. याबाबत बुधवारी महापालिकेत आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, महिला शहराध्यक्ष नलिनी गायकवाड, फारूक रंगरेज, सुदाम भोसले, नामदेव पवार, आसाराम कावरे, आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले. मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा मनपाच्या आवारात भटके कुत्रे सोडण्यात येतील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.