साई संस्थानचे लसीकरण केंद्र मोफत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:10+5:302021-05-08T04:21:10+5:30
शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, जयराम कांदळकर, नवनाथ विश्वासराव, संतोष जाधव, चंद्रकांत गायकवाड यांनी शुक्रवारी संस्थानचे सीईओ ...
शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, जयराम कांदळकर, नवनाथ विश्वासराव, संतोष जाधव, चंद्रकांत गायकवाड यांनी शुक्रवारी संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले.
यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रतिम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते. साईबाबा संस्थानचे लसीकरण केंद्र मोफत करण्यात यावे, हाॅस्पिटलकडे वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून वैद्यकीय सेवा, सुविधा देण्यात याव्यात. कोविड सेंटरमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करण्यात यावे, मंदिर हेल्पलाइनसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, साईभक्तांना घरपोच उदीप्रसाद पाठविण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या सर्व मागण्यांना तत्काळ प्रतिसाद देत सीईओ बगाटे यांनी नगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करत या संदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय कोविड सेंटर येथे मेडिकल स्टोअर सुरू करावे, कर्मचाऱ्यांचा कोरोना विमा काढण्याबाबत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना बगाटे यांनी संस्थान प्रशासनाला दिल्या. हेल्पलाइनसाठी महिला कर्मचारी व उदीप्रसाद या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
------------
फोटो - ०७ शिर्डी शिवसेना
साईबाबा संस्थानचे लसीकरण मोफत करा, अशी मागणी राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने साई संस्थानकडे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, जयराम कांदळकर, नवनाथ विश्वासराव, संतोष जाधव आदी उपस्थित.