मॉलला परवानगी मग मंदिरांना का नाही? राधाकृष्ण विखे यांचा सरकारला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:40 PM2020-08-22T17:40:46+5:302020-08-22T17:41:32+5:30
राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे.
लोणी : राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे येथील व्यावसायिकांचे अर्थचक्र थांबले आहे. सुरक्षिततेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आ.विखे यांनी केली.
समाजहिताचे कोणतेच निर्णय सरकार घेवू शकत नाही. शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. मंत्र्यांचेच दूध संघ असल्याने त्यांनीच सरकारचे अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकºयांच्या पदरी काहीच पडलेले नाही. कोव्हीड-१९ संकटातही राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी उभे राहिले नाही. कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला किंवा फेकून द्यावा लागला. सरकार नावाची व्यवस्था कोणत्याच संकटात शेतकºयांना आणि सामान्य माणसाला मदत करू शकली नसल्याची खंतही विखे यांनी व्यक्त केली.