कोविडचे व्यवस्थापन आरोग्य विभागाकडे देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:07+5:302021-05-20T04:22:07+5:30
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, अमित गांधी, दीपक गुगळे, वसीम शेख, गणेश निमसे आदींनी जिल्हा प्रशासनाला ...
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, अमित गांधी, दीपक गुगळे, वसीम शेख, गणेश निमसे आदींनी जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले. मागील वर्षापासून कोरोनाने नगर जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले आहे. त्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असणारी शासकीय आरोग्य यंत्रणा या संकटाने व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून जिल्हा किंवा तहसील विभागाकडून वारंवार विविध प्रकारचे आदेश कोणत्याही प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी न करता दिले जात आहेत. परंतु, शेवटच्या घटकांमध्ये आरोग्य विभागाला काम करावे लागत आहे. मागील हप्त्यात तहसील तसेच जिल्हास्तरावरून आरोग्य यंत्रणेस कोरोना लसीकरणासोबत आरोग्य केंद्र सांभाळून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच या अतिरिक्त १०० आरटीपीसीआर टेस्ट तसेच अँटिजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.
आधीच आरोग्य यंत्रणेकडे लसीकरण, कोरोना तपासणी करण्याचे काम आहे. लसीकरणाच्या वेळी अनेक लोक वाद घालतात. त्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेचे यापुढील
संपूर्ण नियोजन हे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावे, जेणेकरून त्यांना त्यातील बारकावे समजतील, असे निवेदनात म्हटले आहे.
-----------
फोटो मेलवर
१९ जनाधार निवेदन
कोविड व्यवस्थापनाचे सर्व काम जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे द्यावे, या मागणीचे निवेदन जनाधार सामाजिक संस्थेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.