मांडओहोळ धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:25 PM2019-10-22T13:25:59+5:302019-10-22T13:30:33+5:30
पारनेर तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारे मांडओहोळ धरण मंगळवारी सकाळी तुडुंब भरले. गेल्या अनेक वर्षांनंतर हे धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
पारनेर : तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारे मांडओहोळ धरण मंगळवारी सकाळी तुडुंब भरले. गेल्या अनेक वर्षांनंतर हे धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
मांडओहोळ धरणाची क्षमता ३७० दशलक्ष घनफूट आहे. कान्हूरपठार गावासह १८ गावांची नळ पाणी योजना या धरणातून आहे. याशिवाय टाकळीढोकेश्वर व परिसरातील सहा गावांनाही याच धरणातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे या गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. यामुळे धरण तुडुंब भरले आहे.