मांडवगण फाटा ते पिसोरा खांड रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:08+5:302021-01-16T04:23:08+5:30
मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडगण फाटा ते पिसोरा खांड दरम्यान सुरू असलेले रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे ...
मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडगण फाटा ते पिसोरा खांड दरम्यान सुरू असलेले रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याच्या कामाची पाहणी केली.
रस्ता रूंदीकरण, डांबरीकरणाचे काम सुरू निकृष्ट दर्जाचे होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. या कामाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी डुंकूनही बघत नाहीत. अशा आशयाच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप यांचे पती माजी जिल्ह परिषद सदस्य सचिन जगताप यांच्याकडे आली होती. त्यानंतर सचिन जगताप यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जाबाबत सुचना केल्या .
मांडवगण फाटा ते श्रीगोंदा प्राथमिक जिल्हा मार्ग ६३ या रस्त्याचे खाकीबाबा दर्गापर्यंत (पिसोरा खांड) असे ११ किलोमीटरचे ५.५० मीटर रूंदीकरण व डांबरीकरणाचे १३ कोटी रूपये खर्चाचे काम सुरू आहे. हे काम मे. टी. जी. तोडमल व मे. समीर शेख या कन्ट्रक्शन एजन्सीच्या नावे ठेकेदार विलास जगताप हे करत आहेत.
या कामाच्या दर्जाबाबत रस्त्यावरील मांडवगण, महाडुंळेवाडी, खांडगाव आदी गावच्या ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. यावेळी जगताप म्हणाले, कोणत्याही ठेकेदारास पाठीशी घातले जाणार नाही. काम चांगले झाले पाहिजे. अरूंद व कमी उंचीचे पूर्ण झालेल्या तीन पुलांची कामे पाडून त्याच खर्चात परत करावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता भोसले, इंजिनिअर वराळे, महेश तोगे, अंबादास घोडके, सुरेश लांडगे, उमेश रासकर, राजेंद्र देशमुख, चंदू सदाफुले, लक्ष्मण लोंखडे, बाबासाहेब जगताप, नानासाहेब जगताप, गौतम पठारे आदी उपस्थित होते.
फोटो : १५ मांडवगण रस्ता
मांडवगण फाटा-पिसोरे खांड रस्त्याची पाहणी करताना सचिन जगताप, अधिकारी, ग्रामस्थ.