आज तब्बल ७०६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; आज ८० बाधितांची रुग्णसंख्येत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:30 PM2020-09-12T12:30:13+5:302020-09-12T12:30:59+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७०७ इतकी झाली आहे.

As many as 706 patients were discharged from the hospital today; Today, the number of infected patients has increased to 80 | आज तब्बल ७०६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; आज ८० बाधितांची रुग्णसंख्येत भर

आज तब्बल ७०६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; आज ८० बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७०७ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, संगमनेर १०, नगर ग्रामीण ०२, कॅंटोन्मेंट ०३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी १९, शेवगाव ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७०६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०२, संगमनेर ७१, राहाता ६०, पाथर्डी ४३, नगर ग्रा.३५, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १४,  नेवासा ४४, श्रीगोंदा २७, पारनेर २६, अकोले ४२, राहुरी ३०, शेवगाव ११,  कोपरगाव ३९, जामखेड १९, कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २५४३७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३७०७*

*मृत्यू:४५०*

*एकूण रूग्ण संख्या:२९५९४*

Web Title: As many as 706 patients were discharged from the hospital today; Today, the number of infected patients has increased to 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.