चांगली कामे करताना अनेक अडथळे आणले जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:30+5:302021-02-24T04:22:30+5:30

कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कोपरगाव नगर परिषदचे सफाई मुकादम मनोज यादवभाई लोट यांच्या हस्ते ...

Many obstacles are brought while doing good deeds | चांगली कामे करताना अनेक अडथळे आणले जातात

चांगली कामे करताना अनेक अडथळे आणले जातात

कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कोपरगाव नगर परिषदचे सफाई मुकादम मनोज यादवभाई लोट यांच्या हस्ते करण्यात आले.

लोट यांच्याकडे कोपरगाव अमरधाम हे सफाई मुकादम म्हणून स्वच्छतेची जबाबदारी आहे. तसेच सुरुवातीपासून कोरोनाबाधित मृतांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी या भागातील सफाई मुकादम लोट व त्यांचे सहकारी यांच्याकडे आहे. कोविड काळात रात्री-अपरात्री लोट व त्यांचे सहकारी यांनी मृतांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. अनेक प्रसंगी मृतांचे नातेवाईक जवळ नसल्याने मृतांना अंतिम पाणी देण्याचे काम या समूहाने केले आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी प्रतिष्ठित व्यावसायिक विशाल आढाव, सामाजिक कार्यकर्ते आनंद टिळेकर, पत्रकार अक्षय काळे उपस्थित होते.

.................

फोटो ओळी

कोपरगावात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त स्वछता विभागाचे मनोज लोट यांचा सन्मान करण्यात आला.

२३- कोपरगाव सत्कार

Web Title: Many obstacles are brought while doing good deeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.