कोपरगावात पाचव्या दिवशी मराठा समाजाचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:36 PM2018-08-13T17:36:12+5:302018-08-13T17:36:50+5:30
शहरासह तालुक्यात गुरुवार (९ आॅगस्ट) रोजी सर्वत्र बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशी सोमवारी देखील सुरूच ठेवण्यात आले होते.
कोपरगाव : शहरासह तालुक्यात गुरुवार (९ आॅगस्ट) रोजी सर्वत्र बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशी सोमवारी देखील सुरूच ठेवण्यात आले होते.
कोपरगाव ताल्युक्यातील वारी, कान्हेगाव व मढी येथील सकल मराठा समाजाच्या बांधवानी सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन केले. यापुढे देखील आरक्षण मिळत नाही तोपर्यत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. या आंदोलनासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव दररोज या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिली. १५ आॅगस्टपर्यंत आरक्षण देण्याचे मान्य केले नाही तर असहकार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यात सरकारचे कोणतेही कर न भरणे, वीज, दूरध्वनी बील, नगरपालिका, ग्रामपंचायत करपट्टी न भरणे यासारख्या असहकाराकरून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .
यावेळी व्यासपीठावर साखळी पद्धतीनुसार ठिया आंदोलनप्रसंगी अनिल गायकवाड, अमित आढाव, प्रमोद लबडे, किरण खर्डे, दिनेश पवार, दादा आवारे, विनायक भगत, अमोल लोखंडे, राहुल टेके, बद्रीनाथ जाधव, विशाल गोर्डे, आप्पासाहेब काजळे, अण्णासाहेब टेके, रावसाहेब टेके, अशोक कानडे, अरुण काजळे, दीपक भाकरे, दीपक चौधरी, किशोर तायडे, शरद औताडे, भूषण वाळूंज, मनोज काजळे, सोमनाथ गिरी, परसराम गिरी आदि उपस्थित होते.