संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष!

By शेखर पानसरे | Published: January 27, 2024 12:42 PM2024-01-27T12:42:00+5:302024-01-27T12:42:21+5:30

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

Maratha Kranti Chowk in Sangamnerat, Maratha society's jubilation! | संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष!

संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष!

संगमनेर : मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने संगमनेर शहरातील मराठा क्रांती चौकात मराठा समाज बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंदर्भाने अध्यादेश काढले आहेत. त्यानंतर संगमनेर बसस्थानक परिसरात सकल मराठा समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने एकत्र जमले. 

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डीजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले आहेत. एकमेकांना, नागरिकांना तसेच बसस्थानकातील प्रवाशांना पेढे, जिलेबी, लाडू भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येतो आहे.

Web Title: Maratha Kranti Chowk in Sangamnerat, Maratha society's jubilation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.