मराठा आंदोलन पुन्हा पेटणार :मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:34 PM2018-11-14T12:34:34+5:302018-11-14T12:34:37+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

Maratha movement will revive: Maratha dialogue starts from city | मराठा आंदोलन पुन्हा पेटणार :मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ

मराठा आंदोलन पुन्हा पेटणार :मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
नगर शहरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे यात्रा येवला गावात पोहोचणार आहे़ संगमनेर,अकोले तालुक्यातील मराठा समाज बांधव बाभळेश्वर व कोपरगाव येथे संवाद यात्रेत सहभागी होतील. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत.
त्यानंतर येत्या २६ नोव्हेंबर रोजी यात्रा विधानमंडळावर धडकणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला संजीव भोर, संजय अनभुले, शिवाजी चौधरी, मदन मोकाटे, सचिन चौगुले, अ‍ॅड. सुभाष जंगले, अ‍ॅड. नितीन पठारे, संदीप चोरमले, विजय पठारे, मयूर वांढेकर, प्रमोद भासार, मंगेश आजबे, शरद कार्ले, नंदकुमार कोतकर, विशाल म्हस्के, गणेश शिंदे, शरद दळवी, अमोल पाठक, दीपक मोरे, ज्ञानदेव दिघे, राजेंद्र कर्डिले, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रकाश कदम, गोरख आढाव आदी उपस्थित होते़
मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सरकार पुरस्कृत काहींनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या सुरूवातीपासून सातत्याने फासे टाकण्याचे काम केले. सरकारच्या प्रलोभनाला बळी पडलेल्या काही स्वार्थी लोकांनी भडकाऊ भाषा, हिंसक आंदोलने याद्वारे आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचाही प्रयत्न केला़
मराठा क्रांती नावाची संघटना व राजकीय पक्ष अशी उठाठेव करून समाजाची फसवणूक काहींनी चालविली आहे़ आंदोलकांना विचलित करण्यासाठी मराठा पक्षाची बतावणी काही संधीसाधू करत आहेत.
अशा फाजिल गोष्टींना समाजाने भीक घालू नये. समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करीत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने मराठा संवाद यात्रा आयोजित करण्याचा निर्णय राज्य समन्वय समिती व कोअर कमिटीने जाहीर केल्याचे यावेळी सांगण्यात आले़

Web Title: Maratha movement will revive: Maratha dialogue starts from city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.