मराठा समाज कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:45+5:302021-05-30T04:18:45+5:30
विखे म्हणाले की, आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्या हिताचीच आहे; पण सरकारला केवळ अल्टिमेटम न ...
विखे म्हणाले की, आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्या हिताचीच आहे; पण सरकारला केवळ अल्टिमेटम न देता, सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. केवळ अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्यात आघाडी सरकार स्वत:चा वेळ वाया घालवत आहे. सरकारमधील मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्ये पाहिल्यास आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारचा हेतू प्रामाणिक नसल्याची टीका त्यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पक्ष काढण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत आहे. मात्र, मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाच्या प्रश्नासाठी सर्वांना एकत्रित भूमिका घेऊनच पुढे जावे लागेल. मराठा आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी समाजातील सर्व संघटनांना एकत्रितपणे दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही.