मराठीचा बडेजावपणा मिरवायला आवडते - सोनाली कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:32 PM2017-09-06T19:32:55+5:302017-09-06T19:34:00+5:30

हिंदी, मराठी,तेलगू, गुजराती, कन्नड, इटालियन सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या असल्या तरी माझे मराठीवर वेगळेच प्रेम आहे. मराठीचा बडेजावपणा मिरवायला मला आवडते. मातृभाषा आली नाही तर अपमानास्पद वाटते, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.

Marathi loves to dance - Sonali Kulkarni | मराठीचा बडेजावपणा मिरवायला आवडते - सोनाली कुलकर्णी

मराठीचा बडेजावपणा मिरवायला आवडते - सोनाली कुलकर्णी

श्रीरामपूर : हिंदी, मराठी,तेलगू, गुजराती, कन्नड, इटालियन सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या असल्या तरी माझे मराठीवर वेगळेच प्रेम आहे. मराठीचा बडेजावपणा मिरवायला मला आवडते. मातृभाषा आली नाही तर अपमानास्पद वाटते. भाषेमुळे माझे आकलन होऊन संस्कार घडले. घरात शैक्षणिक वातावरण असताना आई वडिलांच्या प्रेरणेने चित्रपटामध्ये भूमिका करु शकले. आजपर्यंत ८० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले व ७ चित्रपट प्रदर्शित होणार असले तरी मराठी सिनेमात भूमिका करणे मला आवडते. मराठी भाषेबद्दल मला अभिमान आहे, असा दिलखुलास संवाद सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मंगळवारी येथे पत्रकारांशी साधला.
गणेशोत्सवानिमित्त त्या येथे आल्या असता पत्रकार बाळासाहेब आगे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मला ज्या शिक्षकांनी अभिनय करण्यास घडविले त्यांची मी ऋणी आहे. मराठी सिनेमा निर्मात्यांच्या खर्चावर मर्यादा असतात. विनाकारण खर्च परवडत नाही. हिंदी सिनेमा निर्मात्याचे बजेट मोठे असते. मराठीवाल्यांना खर्च करुन ९० टक्के यश प्राप्ती कठीण असते. मराठी चित्रपट पाहण्याकडे कल कमी असला तरी मीडियावाल्यांनी जागृती करुन मराठी सिनेमातील कलाकारांना व सिनेरसिकांना प्रोत्साहित करावे.
नाना पाटेकर यांच्या समवेत भूमिका करण्याची मिळालेली संधी हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. आपण मोठे कलाकार आहोत याची सहकलाकाराला जाणीव होऊ देत नाही. त्याच्याकडून चांगले काम करुन घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्यासारखा एखादाच असतो. जो चित्रपट मी करीत असते, तो मला आवडतो. दिग्दर्शक होण्याइतकी मॅच्युरिटी माझ्यात आलेली नाही, त्यामुळे धाडस करणार नाही,असेही त्या म्हणाल्या.

इंटरनेटवर पाहिला सिनेमा
सोशल मीडियामुळे आजच्या पिढीमध्ये जागरुकता आली आहे. काजवा महोत्सव पाहण्यासाठी पुरुषवाडी (घोटी) येथे गेले असता तेथे चित्रपटगृह नसतानाही आदिवासी लोकांनी सैराट सिनेमा पाहिल्याचे सांगितले. त्यांना कोठे पाहिला असे विचारले असता त्यांनी इंटरनेटवर पाहिल्याचे सांगितले. हे ऐकून आनंद झाला, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.
सैराट व फ्रेंड्ली चित्रपटाचे कौतुक करतानाच मिशन कश्मीर व देवराई, डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातील भूमिका आवडल्या.

Web Title: Marathi loves to dance - Sonali Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.