न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:47+5:302021-01-21T04:19:47+5:30
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त येथील कौटुंबिक न्यायालयात बुधवारी मराठी भाषा जागृती कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी कंक बोलत ...
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त येथील कौटुंबिक न्यायालयात बुधवारी मराठी भाषा जागृती कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी कंक बोलत होत्या. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, ॲड. सुभाष भोर, ॲड. कल्याण पागर आदी उपस्थित होते.
ॲड. बऱ्हाटे म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयात बरेच कामकाज मराठी भाषेतून करण्यात येत आहे. आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. प्रा. मालुंजकर म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषेवर इतर भाषांनी केलेले अतिक्रमण थोपवण्याची जबाबदारी आपलीच आहे. न्यायमंदिरात मराठी भाषा संवर्धन व जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे.
यावेळी ॲड. पागर यांचे मराठी भाषेचा न्यायालयीन वापर या विषयावर व्याख्यान झाले. ॲड. सुभाष भोर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड. वृषाली तांदळे यांनी केले, आभार ॲड. अभय राजे यांनी मानले. यावेळी पॅनल सदस्य ॲड. शिवाजी कराळे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. अशोक बऱ्हाटे, ॲड. सुनील तोडकर, ॲड. अनिता दिघे, ॲड. भानुदास होले, ॲड. प्रज्ञा हेंद्रे, कौटुंबिक न्यायालयाचे अधीक्षक नवाज शेख आदींसह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
२० कार्यशाळा
ओळी- अहमदनगर कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित जागृती कार्यशाळेत बोलताना न्यायाधीश नेत्रा कंक. समवेत वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, प्रा.मच्छिंद्र मालुंजकर, ॲड. सुभाष भोर, ॲड. कल्याण पागर आदी.