नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

By अण्णा नवथर | Published: April 25, 2023 01:25 PM2023-04-25T13:25:43+5:302023-04-25T13:25:51+5:30

आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाने येऊन निवेदन दिले.

March to Superintendent of Police office to demand a case against BJP MLA Nitesh Rane | नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर: नगर शहरात येऊन आमदार नितेश राणे यांनी व्यक्तिगत भांडणाला धार्मिक स्वरूप  देऊन अर्वाच भाषेत शिवीगाळ केली.दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले.महापालिका आयुक्तांना शिवीगाळ करून दमदाटी केली. हा प्रकार गंभीर असून, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी समस्त आंबेडकरी संघटनांच्या वतीने मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाने येऊन निवेदन दिले. पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ,अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. या मोर्चात रिपाईचे (आठवले) अजय साळवे, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड ,किरण दाभाडे, सुशांत मस्के, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, कॉ. अनंत लोखंडे ,भैरवनाथ वाकळे, योगेश थोरात, संजय खामकर, योगेश साठे, संतोष गायकवाड ,रवी सातपुते, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, हर्षद शेख, डॉ.दीपक पापडेजा, संतोष जाधव, सोमा शिंदे, विजय गायकवाड, संदीप वाघमारे, सिद्धार्थ आढाव, सचिन शेलार, विनोद भिंगारदिवे, संध्या मेढे, जया गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: March to Superintendent of Police office to demand a case against BJP MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.