राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी मरकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:08+5:302021-07-17T04:17:08+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील रहिवासी प्रा. प्रशांत मरकड यांची औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुका राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी ...

Markad as the taluka president of the Nationalist Teachers Union | राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी मरकड

राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी मरकड

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील रहिवासी प्रा. प्रशांत मरकड यांची औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुका राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.

औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते प्रा. मरकड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

भावीनिमगावचे माजी सरपंच गोरक्ष मरकड यांचे सुपुत्र प्रा. प्रशांत मरकड औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील महाराष्ट्र ज्युनिअर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात प्रा. मरकड नेहमी आवाज उठवत असतात. वेळोवेळी आंदोलनात सहभागी होत त्यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना तालुकाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र आ विक्रम काळे यांनी प्रदान केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. वाहेद शेख, प्रा. आनंद शिदे, प्रा. गोविद गोंडे, प्रा. अशिष राठोड, प्रा. नितीन खंदारे, प्रा. प्रवीण ढाकणे, प्रा. बाळासाहेब पानकर, प्रा. रामेश्वर काकडे आदी संघटनेचे शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. मरकड यांच्या निवडीबद्दल ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, ॲड. सुहास चव्हाण, प्रताप वाघुंबरे, भावीनिमगावचे सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच शाम शिरसाठ, प्राचार्य रत्नमाला कदम, सहकारी शिक्षक आदींनी काैतुक केले.

-----

१६ प्रशांत मरकड

Web Title: Markad as the taluka president of the Nationalist Teachers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.