बाजार समिती सभापतींचे सह्यांचे अधिकार गोठवले
By Admin | Published: May 13, 2014 11:28 PM2014-05-13T23:28:01+5:302014-05-14T00:19:45+5:30
कोपरगाव बाजार समितीचे सभापती उत्तमराव औताडे यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या संचालकांनी त्यांच्या सह्यांचे अधिकार मंगळवारी झालेल्या बैठकीत अकरा विरूद्ध सात मतांच्या फरकाने गोठवले.
कोपरगाव: कोपरगाव बाजार समितीचे सभापती उत्तमराव औताडे यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या संचालकांनी त्यांच्या सह्यांचे अधिकार मंगळवारी झालेल्या बैठकीत अकरा विरूद्ध सात मतांच्या फरकाने गोठवले. याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव बाजार समितीवर शासनाने प्रशासक नियुक्त केला होता़ परंतु पाच महिन्यांपूर्वी सभापती औताडे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून शासनाच्या निर्णयावर स्थगिती मिळविली होती़ तेव्हापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू झाला होता़ कोपरगाव बाजार समितीत काळे व परजणे गटाची सत्ता आहे़ एक-एक वर्षाचे रोटेशन सभापतीपदासाठी ठरलेले असताना औताडे यांनी राजीनामा दिला नाही़ त्यामुळे परजणे गट नाराज होता़ मंगळवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत कोल्हे आणि परजणे गटाच्या संचालकांनी सभापती औताडेंविरूद्ध मोहीम उघडली़ ११ विरूद्ध ७ मतांच्या फरकाने औताडे यांचे सह्यांचे अधिकार गोठविण्यात आले़ (प्रतिनिधी)