बाजार समित्यांना फळे, भाजीपाला व्यवहारास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:14+5:302021-05-26T04:21:14+5:30

बुधवारपासून (दि. २६ मे) सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा ...

Market committees are allowed to trade fruits and vegetables | बाजार समित्यांना फळे, भाजीपाला व्यवहारास परवानगी

बाजार समित्यांना फळे, भाजीपाला व्यवहारास परवानगी

बुधवारपासून (दि. २६ मे) सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विविध अटी आणि शर्तींवर ही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये बाजार समिती, उपबाजार समितीतील सर्व व्यापारी, त्यातील नोकरवर्ग, हमाल, मापाडी व कामगार यांची आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजन

चाचणी बाजार समितीने करावी. त्यास अनुसरुन पास देण्याबाबतची कार्यवाही बाजार समिती, उपबाजार समितीने करावी. संबंधित बाजार समितीने पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घ्यावा आणि आवश्यक त्या नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी. मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाजार समिती आवारात प्रवेश देऊ नये, एका वाहनासोबत वाहनचालक आणि केवळ एका शेतकऱ्यास प्रवेश देण्यात यावा. बाजार समितीत प्रवेश करण्यापूर्वी वाहनचालक आणि सोबतची व्यक्ती यांची थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था बाजार समितीने करावी. प्रवेशद्वारावर हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करावी. रिटेल, सर्वसामान्य ग्राहकांना बाजार समिती आवारात प्रवेश देता येणार नाही. व्यवहाराकरिता दिलेली मुदत संपल्यानंतर वेळोवेळी बाजार समिती आवारामध्ये निर्जंतुक फवारणी करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समिती यांची राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बाजार समितीमध्ये समन्वयक म्हणून संबंधित तालुक्यांचे उपसहायक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर संबंधित बाजार समितीत सामाजिक अंतर आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, याची खातरजमा करण्याची जबाबदारी असेल. बाजार समितीच्या आवारात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास बाजार समिती बंद करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा आदेशात दिला आहे. हा आदेश २५ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ते ३१ मेच्या सकाळी ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Web Title: Market committees are allowed to trade fruits and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.